विचार बदलवणारे आज काल चे चित्रपट...
मला आज चित्रपटावरून काही तरी सांगायचं आहे.आज काल चे चित्रपट सगळ्याच्या परिचयाचे आहेत.यात काही शंका नाही चित्रपटाचं दिग्दर्शन, चित्रीकरण,अभिनय, सवांद ,कसा बदलत आहे हे कोणी ओळखायला तयार नाही.आजच्या चित्रपटात नुस्ता राडा चाललाय समाज घडवणारा चित्रपट आज पैसे कमवू शकत नाही आणि समाज बिघळवणारा चित्रपट आज खूप चालतो.
याला जिम्मेदार कोण आहे साहजिक च आहे आपण आज सगळ्या समाजात पैसे कमवायचा बाजार मांडला आहे चित्रपट यात काही मागे राहले नाहीत मानसीकता पाहून चित्रपट बनवले जातात असं मी ऐकल होत.पण आज उलट होत आहे चित्रपट पाहून लोकांची मानसीकता बदलत आहे यात टीव्ही क्षेत्र पण काही मागे नाही.आपला चित्रपट पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायल हवा.मूर्ख असलेले लोक यात पुढे पुढे जात आहेत.ज्या गोष्टीला काही किंमत नाही अश्या गोष्टी प्रेक्षकांच्या मनावर ताबा घेत आहेत तश्याच गोष्टी त्याच्या समोर आणल्या जात आहेत
आपण जरी म्हणत असलो की सगळं काही आपल्या मनावर आहे तरी ह्या गोष्टीचा मानवी जीवनावर परिणाम होतोच.या गोष्टीवर आपण विचार केल्या शिवाय राहत नाही
काही चित्रपट चांगले पण तयार केले जातात त्यात मारामारी अंगप्रदर्शन ह्या गोष्टी नसतात पण ते त्या प्रमाणात चालत नाही अश्या चित्रपटाना वाव देणं आपलं काम आहे. धन्यवाद
Comments
Post a Comment